ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि. संचलित आणि
पूर्वा केमटेक प्रा.लि. नाशिक यांच्या सहकार्याने
दुसऱ्या हरितक्रांतीसाठी करूया मधुक्रांती !
शाश्वत शेती आणि उद्योजकतेसाठी
"मधमाशी पालन"
राज्यस्तरीय परिसंवाद व प्रदर्शन
दि. ६-७ डिसेंबर २०१९, स.१० ते ०५
मधमाश्यांसारखा उद्यमशील कीटक हा शेती आणि पर्यावरणातील प्रमुख घटक आहे. पीक उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी अनेक निविष्ठा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. परंतु आजपर्यंत निसर्गाने दिलेल्या या मधमाशीचा पीक उत्पादनात वाढ होण्यासाठी जास्तीचा प्रयत्न मात्र शेतकर्यांकडून केला जात नाही. अर्थात याला तंत्रज्ञान निर्मिती आणि प्रसार करणार्या संस्था जबाबदार आहेत. मधमाशीचा फुलाला होणारा स्पर्श हा परिसासारखा असतो. मधमाशीच्या स्पर्शाने परागीभवन होऊन फळधारणा वाढते आणि सोन्यासारखे उत्पादन मिळते तेही कोणताही अतिरिक्त खर्च न करता. शेती उत्पादन वाढीबरोबरच मधमाशी मध, परागकण, प्रॉपॉलिस, रॉयल जेली, मेण आणि इतरही अनेक पदार्थांची निर्मिती करते, ज्याला मानवी आरोग्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मधमाशी पालनातून शेतीचे शाश्वत उत्पादन मिळविण्याबरोबरच मधमाशी पालन व्यवसाय केला तर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याबरोबरच समाजाच्या निरोगी जीवनासाठी मधमाशी पालनासारखा दुसरा कोणताही व्यवसाय नाही की, जो आजपर्यंत फारच दुर्लक्षित राहिलेला आहे. दुसर्या हरितक्रांतीची अपेक्षा ठेवली तर त्यासाठी मधुक्रांती होणे गरजेचे आहे. याच विचाराने ‘ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि.’ संचलित आणि ‘पूर्वा केमटेक प्रा.लि.’ यांच्या सहकार्याने ‘बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना करून याच माध्यमातून अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मधमाश्यांच्या विविध जातींच्या पेट्या, मधमाश्यांसाठी आवश्यक असलेल्या पिकांची लागवड, मधमाश्यांच्या माध्यमातून विविध उत्पादन अशा या एकत्रित बाबींचे संग्रहालय सुरू केलेले आहे. या सर्व बाबींचा एकूणच उद्देश शेतकरी आणि सर्व समाजाला मधमाश्यांची उपयुक्ततता आणि महत्त्व पटवून देणे. याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेला हा राज्यस्तरीय परिसंवाद आणि प्रदर्शन.
मधमाशीची ओळख
राज्य,देश आणि जागतिक पातळीवर मधमाश्यांचे संवर्धन
मधमाशीचे जीवनचक्र आणि कार्यप्रणाली
मधमाशी संगोपन तंत्रज्ञान
मधमाशीचे पिक उत्पादनामध्ये महत्व
मधमाशीचे पिक उत्पादनामध्ये महत्व
मधमाशी पालनातून उद्योजकता विकास
बसवंत मधमाशी उद्यान, मुखेड रोड, पिंपळगाव (बसवंत), ता. निफाड, जि. नाशिक (महाराष्ट्र) ४२२२०९
“When the bees disappear from this world, the existence of the human race will end only four years later.” -Albert Einstein
Honey is referred to as nectar on earth and this description is true because natural raw honey is very tasty and superior to 'safe food and medicine'.
Bees are a major component of the entrepreneurial insect farming environment. As well as bees are needed for the good harvest of the crop.
Baswant Honeybee Park situated at Pimpalgaon (B) near to Nashik city. The main aim of park is aware to people about the role of honeybees in nature.
Honeybees play important role in pollination and also increase agricultural production.
In Baswant Honeybee Park different things and concept we have prepare for creating awareness about honeybee like Bees Sculpture, slogans, Bees Life Cycle charts, interesting things about honey bees.
The most important part of Baswant Honeybee Park is “Honeybee Training Center”. Baswant Heney Bee Training Center is developed for the purpose of spreading pollination by providing bee keeping training to the farmers, students and for generating additional employment for the beekeepers. In Baswant Honeybee Training Center special apiary developed for practical. We conducted two types of training Beekeeping Training for those are interested and want to become a beekeeper it includes theory and practical sessions, The main purpose of this training is to generate self-employment in youth, and purpose of Awareness Training program for Farmers, Students and all visitors, is to know the importance of honeybees in nature and in our life.